• Download App
    इंटिरीअर डीझाईनचे बहाण्याने बँक मॅनेजरची सात लाखांची फसवणुक। Bank manager house Interior design work २२yrs lady cheated seven lakh rupees

    इंटिरीअर डीझाईनचे बहाण्याने बँक मॅनेजरची सात लाखांची फसवणुक

    पुण्यातील एका बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यास एका २२ वर्षीय तरुणीने फ्लॅटचे इंटिरीअर डिझाईन व फनिर्चरचे काम करण्याच्या बहाण्याने सहा लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. Bank manager house Interior design work २२yrs lady cheated seven lakh rupees


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -पुण्यातील एका बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यास एका २२ वर्षीय तरुणीने फ्लॅटचे इंटिरीअर डिझाईन व फनिर्चरचे काम करण्याच्या बहाण्याने सहा लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी शाेनी सिध्दार्थ विर्दी (वय-४४,रा.विमाननगर,पुणे) यांनी विमानतळ पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    तक्रारदार शाेनी वर्दी एका बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम करत आहे. त्यांना त्यांचे विमाननगर परिसरातील फ्लॅटचे इंटिरीअर डिझाईन व फर्निचरचे काम करण्याचे असल्याने त्यांना जस्ट डाईलवरुन संबंधित इंटरेअिर तरुणीचा नंबर मिळाला. तरूणीशी संर्पक साधल्यानंतर तिने वर्दी यांना माेबाईलवर वेगवेगळे डिझाईनचे फाेटाे पाठवुन तक्रारदार यांच्याकडून वेळाेवेळी फर्निचरसाठी पैसे घेवून त्यांचे घरातील फर्निचरचे अर्धवट काम केले. त्याचप्रमाणे त्यांना नवीन एसीवर सवलत मिळत असल्याचे सांगुन व साेफ्यावरील कपडे खरेदी करण्याचे असल्याचे सांगत एकूण सहा लाख ९५ हजार रुपये घेवून काेणतेही सामन न देता तसेच काम न करता फसवणुक केली. याबाबत त्यांनी तिला विचारणा केली असता तिने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने याप्रकरणी शाेनी वर्दी यांनी पाेलीसांकडे तात्काळ फिर्याद दाखल केली आहे. याबाबत विमानतळ पाेलीस पुढील तपास करत आहे.



    फर्निचरचे कामाच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणुक

    लाेणीकंद परिसरात वैकफिल्ड कंपनीजवळ शाेभाव्हिला या बंगल्याचे मालक असलेल्या नंदिनी सिध्दार्थ वाघमारे (वय-२९) यांचे राहते बंगल्याचे फर्निचरचे काम सध्या सुरु हाेते. त्याकरिता फर्निचरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी वेळाेवेळी ऑनलाईन व राेख स्वरुपात पैसे दिले असताना, फर्निचरचे काही काम करुन वाघमारे याचा विश्वास संपादन केला. सदर फर्निचरचे काम करणाऱ्यांनी त्यांच्या बंगल्याची चावी घेवून त्यांचे लाॅकर मधील साडेपाच ताेळे साेन्याचे दागिने व सामानाचे पैसे असे सहा लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणुक केली आहे.

    Bank manager house Interior design work २२yrs lady cheated seven lakh rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस