• Download App
    संतापजनक : क्रेडिट कार्डचं बिल थकल्याने औरंगाबादेत महिलेकडे सेक्सची मागणी, पोलिसांकडून कारवाईऐवजी तक्रारदारालाच त्रास । Bank agent seeks sex from Aurangabad woman for unpaid credit card dues

    संतापजनक : क्रेडिट कार्डचं बिल थकल्याने औरंगाबादेत महिलेकडे सेक्सची मागणी, पोलिसांकडून कारवाईऐवजी तक्रारदारालाच त्रास

    Bank agent seeks sex from Aurangabad woman : क्रेडीट कार्डचे थकलेले बिल भरले नाही म्हणून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आला आहे. कंपनीच्या वसुली एजंटने महिलेला शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रकारानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली, परंतु औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी तक्रारकर्त्यांनाच त्रास दिला असल्याचे समोर आले आहे. Bank agent seeks sex from Aurangabad woman for unpaid credit card dues


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : क्रेडीट कार्डचे थकलेले बिल भरले नाही म्हणून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आला आहे. कंपनीच्या वसुली एजंटने महिलेला शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रकारानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली, परंतु औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी तक्रारकर्त्यांनाच त्रास दिला असल्याचे समोर आले आहे.

    काय आहे प्रकरण?

    क्रेडीट कार्डच्या थकीत बिलासाठी धमक्या, शिवीगाळ आणि मारहाण हे प्रकार नवीन नाहीत. परंतु, बिल भरले नाही म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या या पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार देऊनही त्यांची दखल घेतलेली नाही.

    औरंगाबादेत एका कुटुंबात पत्नीकडे क्रेडिट कार्ड होते. त्यावर त्यांनी 46 हजारांची खरेदी केली, त्यातील 25 हजार भरले परंतु लॉकडाऊनमुळे व्यवसाय कमी झाला आणि क्रेडीट कार्डचे बिल थकले. यामुळं कंपनीकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाला. सुरुवातीला थोडंबहुत बोलल्यानंतर कंपनीचे लोक थेट शिवीगाळ करू लागले, एवढंच नाही तर पैसै नसतील तर शरीरसंबंधांची मागणी या कंपनीच्या वसुली एजंटने केली. एवढंच नाही तर या एजंटने पीडित महिलेच्या वडिलांचा नंबर शोधून त्यांनाही अपशब्द वापरले.

    पोलिसांचा उलट जाच?

    अखेर वैतागलेल्या कुटुंबाने थेट एमआयडिसी सिडको पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. एका महिलेला अशी मागणी करणं गुन्हाच आहे तरीही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुलै महिन्यात तपासासाठी इन्क्रेडीबल इंडिया या दिल्लीच्या कंपनीत चौकशीला जायचं असे पोलिसांनी सांगितले, तिथं जाऊन थातूरमातूर चौकशी पोलिसांनी केली आणि तेथून तक्रारदारालाच वैष्णव देवीचे तिकीट काढायला लावून पोलिसांनी फुकट तीर्थयात्रा केली.

    अखेर कंटाळलेल्या या कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आता तरी न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. क्रेडिट कार्ड कंपनीचे पैसै भरायचेच आहेत, मात्र देशातल्या नामांकीत एसबीआय सारख्या कंपनीचे कार्ड घ्यायचे आणि त्यांनी नियुक्त केलेल्या वसुली कंपनीचे लोक असे वागतील तर जबाबदार कोण असा प्रश्न आहे. आता या सगळ्यानंतर औरंगाबादच्या या दोषी पोलिसांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Bank agent seeks sex from Aurangabad woman for unpaid credit card dues

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार