• Download App
    विधिमंडळात सावरकरांशेजारी बाळासाहेबांचे तैलचित्र; शिंदे - फडणवीसांबरोबर उद्धव ठाकरे मंचावर बसणार?? Balasaheb Thackeray's portrait to be installed in maharashtra legislature next to savarkar portrait

    विधिमंडळात सावरकरांशेजारी बाळासाहेबांचे तैलचित्र; शिंदे – फडणवीसांबरोबर उद्धव ठाकरे मंचावर बसणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. २३ जानेवारीला विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण या दोन्ही नेत्यांना देण्यात आले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच आमने – सामने येणारे हे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. Balasaheb Thackeray’s portrait to be installed in maharashtra legislature next to savarkar portrait

    ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का?

    विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण २३ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या विशेष समारंभाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान देण्यात येणार आहे. मात्र, ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



    मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा संकल्प केला. त्यानुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधान भवनात बसवण्याची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केले होते.

    सावरकरांशेजारी बाळासाहेबांचे तैलचित्र

    त्यानुसार २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शुक्रवारी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारीच बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

    Balasaheb Thackeray’s portrait to be installed in maharashtra legislature next to savarkar portrait

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!