विशेष प्रतिनिधी
सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य रांगोळी रेखाटली असून या माध्यमातून त्यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn
१६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे रेखाटले आहेत. त्याद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालय आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी साकारली. रांगोळी काढण्यासाठी ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला आहे.
यासाठी २७ किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. सोलापुरातील चित्रकार सिद्धाराम नालवार, प्रेम आडकी आणि सायली घंटे या तिघांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे.
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी
- सोलापुरातील तीन कलाकारांचा अभिनव उपक्रम
- १६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे साकारले
- विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी
- ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला
तब्बल २७ किलो रांगोळीचा वापर
Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली