• Download App
    बाळासाहेब ठाकरे जयंती : दारातील जोड्यांची श्रीमंती आणि मातोश्रीचा वारसा Balasaheb Thackeray jayanti : grand legacy of matoshree lost today!!

    बाळासाहेब ठाकरे जयंती : दारातील जोड्यांची श्रीमंती आणि मातोश्रीचा वारसा

    विशेष प्रतिनिधी

    हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या असंख्य आठवणींचा पट अनेक जण उलगडत आहेत. यात त्यांच्या जैविक वारसा पासून ते वैचारिक वारसांपर्यंत आणि वैचारिक विरोधकांपर्यंत सगळे आहेत.Balasaheb Thackeray jayanti : grand legacy of matoshree lost today!!

    स्वतः बाळासाहेबांची जडणघडण ही प्रबोधनकारांच्या कडक शिस्तीत झाली. व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख हा बाळासाहेबांचा प्रवास स्वतः प्रबोधनकारांनी पाहिला. याच प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना एकदा आपल्या घरातल्या दरवाजात नेऊन सांगितले होते, ही पहा ही आपली खरी श्रीमंती!! आपल्याकडे पैसा अडका नाही पण “हे” आहे आणि हीच आपली खरी श्रीमंती आहे, असे प्रबोधनकार बाळासाहेबांना दरवाज्यात असलेल्या असंख्य जोड्यांकडे बोट दाखवून म्हणाले होते. प्रबोधनकारांकडे दिवाळीच्या फराळाला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते आचार्य अत्रे एकत्र यायचे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक धुरंधर नेत्यांचा राबता प्रबोधनकारांच्या घरी असायचा. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या पाहुण्यांची सरबराई करण्यात मग्न असायचे. ही आठवण खुद्द बाळासाहेबांनीच अनेकदा सांगितली आहे.



    बाळासाहेबांनी या श्रीमंतीचा वारसा मातोश्रीत ही जपला. म्हणूनच बाळासाहेब हे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट या पलिकडचे असंख्य लोकांचे मित्र बनले होते. दिलीप कुमार सारखे अनेक चित्रकार कलावंत मातोश्री मध्ये येत होते. मायकेल जॅक्सन पासून जावेद मियांदाद पर्यंत आणि अगदी शरद पवार, प्रतिभाताई पाटलांपासून प्रणव मुखर्जींपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर हजेरी लावली होती. मातोश्री हे त्या अर्थाने या सर्व ज्येष्ठ वरिष्ठांसाठी मुक्त द्वार होते!!

    बाळासाहेब क्वचितच मातोश्री बाहेर पडून कुणाला भेटायला गेले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण हे याला अपवाद होते. बाळासाहेब त्यांना भेटायला पुण्याला खास त्यांच्या घरी आले होते. ही बाळासाहेबांची मातोश्री बाहेरची शेवटची भेट. पण बाकी सगळ्यांना बाळासाहेब भेट द्यायचे ते, मातोश्रीतच!! ही दरवाजातील जोड्यांची श्रीमंती आणि हा मातोश्रीचा वारसा आज कुठे आहे??, हाच प्रश्न पडला आहे!!

    Balasaheb Thackeray jayanti : grand legacy of matoshree lost today!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा