वृत्तसंस्था
मुंबई – अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने नामंजूर केला आहे. वाझेवर नुकतीच खासगी रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया झाली. Bail plea of Sachin Waze rejected bu Court
त्यामुळे पुढील उपचार आणि देखभालीसाठी घरी नजरकैदेत राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज वाझेने केला होता. त्यावर विशेष न्या. ए. टी. वानखेडे यांच्या पुढे सुनावणी झाली. एनआयएच्या वतीने या अर्जाला विरोध करण्यात आला.
वाझेवर सरकारी रुग्णालयात आणि कारागृहात योग्य ते उपचार केले जाऊ शकतात, तसेच त्याची देखभालही घेतली जाईल, असे एनआयएकडून सांगण्यात आले.
न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि घरामध्ये नजरकैदेत ठेवण्याची मागणी अमान्य केली. वाझेला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात यावे आणि आवश्यकता वाटल्यास जे. जे. रुग्णालयात दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच घरचे जेवण देण्याची वाझेची मागणी न्यायालयाने मान्य केली.
Bail plea of Sachin Waze rejected bu Court
महत्त्वाच्या बातम्या
- भंगारातून रेल्वेने केली 227.71 कोटी रुपयांची कमाई
- शशी थरूर, मनीष तिवारी यांनीही कपिल सिब्बल यांची बाजू उचलून धरली!!
- नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 38 रूग्णवाहिकांची केली मागणी
- पश्चिम बंगालची पोटनिवडणूक : ममता बॅनर्जी जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार, भवितव्य मतदान यंत्रात बंद, रविवारी निकाल जाहीर; अख्ख्या देशाचे लक्ष
- 2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा