प्रतिनिधी
मुंबई : मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठाण राणा दाम्पत्याला करूच देणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना कडाडून विरोध केला. तसेच राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाच्या बाहेर प्रचंड गोंधळ घातला. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली होती. या शिवसैनिकांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसले होते. या शिवसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.Bail granted to 16 Shiv Sainiks protesting in front of Rana couple’s house
घोषणाबाजी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे खार येथील निवासस्थान गाठून प्रचंड गोंधळ घातला होता. शेकडोच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १६ शिवसैनिकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
घोषणाबाजी करुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या शिवसैनिकांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण आता या गुन्ह्यांतील १६ शिवसैनिकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
Bail granted to 16 Shiv Sainiks protesting in front of Rana couple’s house
महत्त्वाच्या बातम्या
- ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करणार, पण दिवाळीनंतर आणि नेतृत्व पडळकरांचे!!
- दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी
- पित्याकडून आठ वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार
- भोंगे आले अंगावर, ढकलले केंद्रावर : केंद्राकडे शिष्टमंडळ नेण्याची ठाकरे – पवार सरकारची तयारी