• Download App
    'बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे' फेम सहदेव दिरदोचा भीषण अपघात ; गंभीर जखमी। 'Bachpan ka pyaar mera bhool nahi jaana re' fame Sahadeva Dirdocha horrible accident Seriously injured

    ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ फेम सहदेव दिरदोचा भीषण अपघात ; गंभीर जखमी

    सहदेवचा अपघात झाला असून सध्या तो कोम्यात असल्याची माहिती प्रसिद्ध रॅपर बादशाह यांने दिली आहे. ‘Bachpan ka pyaar mera bhool nahi jaana re’ fame Sahadeva Dirdocha horrible accident Seriously injured


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ या गाण्याच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेल्या सहदेव दिरदो बाबत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे.सहदेव दिरदोचा मोठा रोड अपघात झाला असून या अपघतात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.यावेळी सहदेवचा अपघात झाला असून सध्या तो कोम्यात असल्याची माहिती प्रसिद्ध रॅपर बादशाह यांने दिली आहे.

    मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास तो मित्रांसोबत टू व्हीलरने जात असता त्याचा अपघात झाला.सहदेव रहा मित्रांसोबत दुचाकीवरून शबरी नगरच्या दिशेने जात असताना अचानक रस्त्यावरील गिट्टी आणि वाळूमुळे त्यांची दुचाकी अनियंत्रितपणे उलटली. हेल्मेट न घातल्याने अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समजतंय.

    आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.अगोदर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास जगदलपूर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे एसपी सुनिल शर्मा आणि कलेक्टर विनीत नंदनवार यांनी रुग्णालयात धाव घेत चांगल्या उपचाराचे निर्देश दिले आहेत.

    अपघाताबाबत माहिती मिळताच सहदेवचे सर्व चाहते दु:खी झाले आहेत. सहदेववर पूर्ण उपचार केले जातील, असे आश्वासन छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या आश्वासनानंतर सहदेवला जगदलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

    ‘Bachpan ka pyaar mera bhool nahi jaana re’ fame Sahadeva Dirdocha horrible accident Seriously injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ