• Download App
    बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा तरी आमदारकी होणार नाही रद्द; सोशल मीडियावर चर्चा, पण कारण काय??Bacchu kadu won't loose his maharashtra legislative assembly membership as he may not be disqualified according to rules

    बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा तरी आमदारकी होणार नाही रद्द; सोशल मीडियावर चर्चा, पण कारण काय??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवल्यामुळे सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभेच्या सभापतींनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना देखील दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होईल किंवा कसे, याविषयी सोशल मीडिया जोरदार चर्चा आहे. Bacchu kadu won’t loose his maharashtra legislative assembly membership as he may not be disqualified according to rules

    मात्र, बच्चू कडूंची आमदारकी रद्द होण्याची कायदेशीर शक्यता नाही. कारण बच्चू कडू यांना जी दोन वर्षांची शिक्षा झाली आहे, ती दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पण एकाच वेळी भोगावयाची आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांना एकच वर्ष तुरुंगात राहावे लागण्याची शक्यता आहे.

    अर्थात या शिक्षेविरोधात बच्चू कडू हे आधीच वरिष्ठ न्यायालयात गेले आहेत. त्यामुळेही त्यांची सुनावणी होऊन त्या शिक्षेचा फेरविचार झाला तर आपोआपच आमदारकी रद्द होण्यापासून बच्चू कडू वाचतात, हा त्यातला महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे.

     बच्चू कडूंचे प्रकरण काय??

    सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता बच्चू कडू यांची आमदारकी जाणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार, खासदार यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होते. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आमदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, काही मुद्द्यानुसार, बच्चू कडू यांच्या आमदारकीला सध्या तरी कोणताही धोका नाही.

    नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून 2017 मध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने नाशिक महापालिकेवर आंदोलन केले होते. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारण्यात आल्याचे सांगितले जाते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला होता.

     दोन वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा

    बच्चू कडू यांना दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी एक-एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी अधिकाऱ्याला अपमानित करणे अशा दोन प्रकरणांचा समावेश आहे. यातली प्रत्येकी एक-एक वर्षाची शिक्षा त्यांना एकत्रित भोगावयाची असल्याने प्रत्यक्षात त्यांना संबंधित शिक्षा कायम झाली, तरी ती एकच वर्ष भोगावी लागणार आहे आणि लोकप्रतिनिधी असलेल्यांना एकाच प्रकरणात दोन आणि त्याहून अधिक वर्षांची शिक्षा सुनावली तरच त्यांची आमदारकी, खासदारकी तातडीने रद्द केली जाते. त्यामुळे बच्चू कडू यांना संबंधित नियम लागू होत नाही.

     प्रत्यक्षात एकाच वर्षाची शिक्षा भोगणे

    बच्चू कडू यांना दोन वर्षांची सलग शिक्षा झालेली नाही. दोन खटल्यात प्रत्येकी एका वर्षाची शिक्षा झाली असून ती एकत्रितपणे (Concurrent) भोगायची आहे. म्हणजे त्यांना एक वर्षाचीच शिक्षा भोगायची आहे. परिणामी त्यांना हा कायदा लागू होत नाही. शिवाय त्यांनी अपील सुद्धा केले आहे.

     राहुल गांधींनी अद्याप अपील केलेले नाही

    अनेक प्रकरणांमध्ये सत्र न्यायालये शिक्षा सुनावतात. त्यांना लोकप्रतिनिधी वरिष्ठ कोर्टात आव्हान देतात. त्या परिस्थितीत संबंधितांची आमदारकी, खासदारकी रद्द केली जात नाही. अपीलात गेलेल्या आमदार, खासदाराच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास आणि संसद, विधिमंडळाने आदेश काढल्यास संबंधित सदस्यांना आपले पद कायम राखता येते.  राहुल गांधी अद्याप वरिष्ठ कोर्टात गेलेले नाहीत. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, तर बच्चू कडू हे आधीच वरिष्ठ कोर्टात आपल्या शिक्षेविरुद्ध दावा दाखल करून बसले आहेत.

    Bacchu kadu won’t loose his maharashtra legislative assembly membership as he may not be disqualified according to rules

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा