प्रतिनिधी
पुणे : आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलणे म्हणजे काजव्यांनी सूर्याविषयी बोलण्यासारखे आहे. सावरकर म्हणजे तेज तेज आणि तेजच, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आठवणी जागविल्या. निमित्त होते, विक्रम संपत यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्राच्या पहिल्या भागाच्या अनुवादाचे प्रकाशन…!! Babasheb Purandare enlightenmend Savarkar brite memoies
हा अनुवाद स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि विश्वस्त मंजिरी मराठे यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या निवासस्थानी करण्यात आले, त्यावेळी शिवशाहीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणी जागविल्या. एखादे फूल ताजे असते तशा सावरकरांच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेजच… आत्ताच्या पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सावरकरांशी त्यांची भेट 1938 साली प्रथम झाली. त्यानंतर ते नियमितपणे सावरकरांना भेटत होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समोर एकदा त्यांचा हुबेहुब आवाज काढला. त्यावेळी फक्त नकलाच करत बसणार का?, असा रोकडा सवाल सावरकरांनी बाबासाहेब पुरंदरे यांना केला. नकलांपेक्षा मोठे कार्य आपल्या हातून करण्यासाठीच त्यांनी एक प्रकारे या वक्तव्यातून आपल्याला प्रेरित केल्याचे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. सावरकरांच्या तेजस्वी वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या अनेक आठवणी यावेळी त्यांनी सांगितल्या.
Babasheb Purandare enlightenmend Savarkar brite memoies
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे नवे खोटे : परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले – भारताने काश्मीरमध्ये वापरली रासायनिक शस्त्रे
- प्रॉव्हिडंट फंडच्या खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ
- हिंदू-मुस्लीम संबंध; दोन ध्रुव एकत्र आणणारा सार्वजनिक गणेशोत्सव
- भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री; घाटलोडियाचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी
- सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा छळ, काँग्रेसच्या आमदारासह मुलगा आणि मुलीवर गुन्हा