• Download App
    'आझादी का अमृत महोत्सव' : नेहरू युवा केंद्रातर्फे ऐतिहासिक थिबा राजवाडा येथे राबवले स्वच्छ भारत अभियान'Azadi Ka Amrit Mahotsav': Nehru Youth Center launches Swachh Bharat Abhiyan at historic Thiba Rajwada

    ‘आझादी का अमृत महोत्सव’ : नेहरू युवा केंद्रातर्फे ऐतिहासिक थिबा राजवाडा येथे राबवले स्वच्छ भारत अभियान

    या अभियानात ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा रत्नागिरी आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.’Azadi Ka Amrit Mahotsav’: Nehru Youth Center launches Swachh Bharat Abhiyan at historic Thiba Rajwada


    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांच्या तर्फे ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा परिसरात दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी भारत सरकारचा ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘स्वच्छ भारत’ अभियान राबवण्यात आले.

    जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुरानी झाखड,व्यसनमुक्ती सेवा केंद्राचे बाळ सत्याधारी महाराज व त्यांचे सहकारी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी सोनाली कदम व शिवाजी उकरंडे व त्यांचे स्वयंसेवक उपस्थित होते.



    तसेच नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आणि पुरातत्व विभागाचा स्टाफ यांची उपस्थिती होती.

    या अभियानात ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा रत्नागिरी आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. व्यसनमुक्ती सेवा केंद्र तर्फे ग्रास कटर च्या सहाय्याने आजूबाजूच्या परिसरातील गवत काढण्यात आले. एकत्रित केलेले प्लास्टिक व कचरा नगर परिषदेच्या गाडीत जमा केले. त्यानंतर या कार्याक्रमाचा समारोप करण्यात आला.

    ‘Azadi Ka Amrit Mahotsav’: Nehru Youth Center launches Swachh Bharat Abhiyan at historic Thiba Rajwada

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!