• Download App
    सावरकर गौरव यात्रेनंतर अयोध्या दौरा; हिंदुत्व अजेंड्याच्या बळकटीसाठी जोर - बैठका!!|Ayodhya tour after savarkar gaurav yatra, its strong efforts to continue Hindutva Agenda

    सावरकर गौरव यात्रेनंतर अयोध्या दौरा; हिंदुत्व अजेंड्याच्या बळकटीसाठी जोर – बैठका!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : येत्या काही दिवसांत शिंदे – फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणार सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीत राजकीय हालचाली वाढल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीपेक्षा शिवसेना – भाजप मधल्या राजकीय हालचाली अधिक अधिक अर्थपूर्ण आणि सरकार मजबूतीकरणाच्या असल्याचे दिसत आहेत.Ayodhya tour after savarkar gaurav yatra, its strong efforts to continue Hindutva Agenda

    वीर सावरकर गौरव यात्रेपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा हा हिंदुत्वाचा अजेंडा बळकटी साठी काढलेल्या जोर बैठकांबासारखाच आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू झाल्या असतानाच त्याचवेळी सत्ताधारी शिवसेना – भाजपने वीर सावरकर गौरव यात्रांचा 288 विधानसभा मतदारसंघात धडाका लावला, तर दुसरीकडे त्या संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौराही सुरू केला.



    पण त्याचवेळी महाविकास आघाडीत नेमकी राजकीय स्थिती काय आहे??, याचा आढावा घेतला तर काय लक्षात येते??, आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू झाल्या असल्या तरी वज्रमूठीतली अंगठ्यापासूनची बोटे ढिली पडायला लागली आहेत. म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बेबनाव झाला आहे. आधी सावरकर मुद्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले, तर नंतर पवारांनी अदानी मुद्यावर मोदी आणि अदानींना अनुकूल भूमिका घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत आणि केंद्र स्तरावरच्या होऊ घातलेल्या विरोधी ऐक्यात पाचर मारली आहे. तरीही मराठी माध्यमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून ठाकरे – पवारांच्या राजकीय अपेक्षा वाढविणाऱ्या बातम्या दिल्या आहेत.

    या बातम्यांचे स्वरूप असे आहे, की जणूकाही सुप्रीम कोर्ट ठाकरे – पवारांच्या बाजूने संपूर्ण अनुकूल निकाल देऊन ठाकरे – पवार सरकार महाराष्ट्रात जसेच्या तसे पुन्हा प्रस्थापित करणार आहे!! अर्थात या बातम्या म्हणजे मराठी माध्यमांची राजकीय मजबूरी किंवा ठाकरे – पवारांवरचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार असे म्हणता येईल.

     

    कारण एकतर सुप्रीम कोर्टाचा निकाल एकतर मराठी माध्यमांना हवाय म्हणून फुटणार नाही. किंवा तो संपूर्णपणे 100 % ठाकरे – पवारांना हवाय तसा लागणारही नाही. सुप्रीम कोर्ट या अभूतपूर्व नाजूक मसल्यावर जास्तीत जास्त काटेकोर कायदेशीर बाजू पाळूनच निकाल देईल, जसा न्यायाच्या दृष्टिकोनातून देणे अपेक्षित आहे!!

    अर्थात महाविकास आघाडीची विशेषतः ठाकरे – पवारांची जशी भिस्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आहे, तेवढी भिस्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आणि भाजपने त्यावर ठेवलेली नाही. किंबहूना त्यासाठीच तर त्यांची महाराष्ट्रात हिंदुत्ववादी अजेंडा बळकट करण्याची त्यांची मेहनत आणि कसरत सुरू आहे. त्यामध्ये कोठे ढिलाई येऊ नये म्हणून 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सावरकर गौरव यात्रा काढण्याचा उपक्रम देऊन तो यशस्वी केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा राष्ट्रीय पातळीवर गाजवण्याचा आणि हिंदुत्ववादी अजेंडा पूर्ण यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठीच सावरकर यात्रेनंतर अयोध्या दौरा हा हिंदुत्व अजेंड्यासाठी जोर – बैठका हा उपक्रम सुरू आहे!!

    Ayodhya tour after savarkar gaurav yatra, its strong efforts to continue Hindutva Agenda

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस