• Download App
    Yes Bank : घोटाळ्याच्या पैशातून अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 1000 कोटींची हेरिटेज बिल्डिंग खरेदी; सीबीआयचे आरोपपत्र Avinash Bhosle's purchase of 1000 crore heritage building in London with scam money

    Yes Bank:घोटाळ्याच्या पैशातून अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 1000 कोटींची हेरिटेज बिल्डिंग खरेदी; सीबीआयचे आरोपपत्र

    वृत्तसंस्था

    मुंबई : पुण्यातील उद्योजक आणि पवारांसह अनेक नेत्यांचे निकटवर्ती अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा उल्लेख सीबाआयने आरोपपत्रात केला आहे. त्यामुळे अविनाश भोसले यांची लंडनमधील मालमत्ताही सीबीआयच्या स्कॅनरखाली आली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून ही माहिती समोर आली आहे. Avinash Bhosle’s purchase of 1000 crore heritage building in London with scam money

    लंडनमध्ये इमारत खरेदी 

    लंडनमधील “फाईस ट्रॅक” ही अलिशान हेरिटेज इमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या इमारतीत 200 खोल्यांचे शानदार हेरिटेज हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बकिंगहॅम पॅलेसजवळ ही हेरिटेज इमारत आहे. अविनाश भोसले यांनी ती खरेदी केल्यानंतर भारतीय उद्योजकाच्या या साहसाची त्यावेळी मोठी चर्चाही झाली होती.



    इमारत खरेदी एक हजार कोटींची

    या हेरिटेज इमारतीची खरेदी आणि तिचे हाॅटेलमध्ये रूपांतर यासाठी लागलेल्या 1000 कोटी रुपयांपैकी 700 कोटी रुपये अविनाश भोसले यांनी येस बँकेतून कर्ज स्वरुपात घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहे. या कर्जात अनियमितता आहे. केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून 70 कोटी रुपये दिले गेले, रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण 700 कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः 300 कोटींची रक्कम भरत व्यवहार इमारत खरेदीसाठी केला होता.

    व्यवहार सीबीआयच्या रडारवर

    हा व्यवहार सीबीआयच्या रडारवर आहे. या व्यवहारांचा तपशील काय होता याचाच तपास सीबीआय करीत आहेत, सध्या अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची परत सीबीआय कोठडी घेतली जाऊ शकते आणि परत चौकशी केली जाऊ शकते.

    26 मे रोजी भोसलेंना अटक

    अविनाश भोसले यांना डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

    – पुण्यातील मालमत्ता जप्त

    सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणांची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे – मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

    Avinash Bhosle’s purchase of 1000 crore heritage building in London with scam money

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस