Author Vishwas Patil : पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात आला. Author Vishwas Patil And Hastimal Hasti Honoured By Governor Bhagatsingh Koshiyari Today in Mumbai
वृत्तसंस्था
मुंबई : पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात आला.
श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार विश्वास पाटील यांना आज (दि. 9) राजभवन येथे प्रदान करण्यात आला. जेष्ठ साहित्यिक हस्तिमल हस्ती यांना 2020 या वर्षासाठीचा राजीव सारस्वत सन्मान प्रदान करण्यात आला.
सुप्रसिध्द साहित्यिक, कवी व हिंदुस्थान पेट्रोलियम येथे महाव्यवस्थापक (राजभाषा) पदावर कार्यरत असलेल्या राजीव सारस्वत यांचे मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 च्या अतिरेकी हल्ल्यात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे साहित्यिकांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ देण्यात येतो.
कार्यक्रमाला श्रुती संवाद अकादमीचे अध्यक्ष अरविंद राही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक पुष्प जोशी, महासचिव डॉ. अनंत श्रीमाली आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वागीश सारस्वत, संजीव निगम तसेच इतर निवडक साहित्यिकांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Author Vishwas Patil And Hastimal Hasti Honoured By Governor Bhagatsingh Koshiyari Today in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० जागांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड
- काश्मिरात अल्पसंख्याकांची हत्या करणाऱ्यांविरुद्ध केंद्राचे मोठे पाऊल, शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सैन्याला निर्देश
- Cruise Drugs Case : ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरलाही बोलावले, एनसीबी कार्यालयात चौकशी सुरू
- केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स : कंटेनमेंट झोनमध्ये सभेस परवानगी नाही, साप्ताहिक आकडेवारीवरून सूट किंवा निर्बंध ठरवणार
- लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा दसऱ्याला जाळणार पीएम मोदी-अमित शहांचा पुतळा, 18 ऑक्टोबरला देशभरात रेल्वे रोको