• Download App
    औरंगाबाद : सिडको भागातील प्रियदर्शनी उद्यानात सापडली तब्बल दोन किलो ब्रिटीशकालीन नाणी|Aurangabad: Two kg British coins were found in Priyadarshini Park in CIDCO area

    औरंगाबाद : सिडको भागातील प्रियदर्शनी उद्यानात सापडली तब्बल दोन किलो ब्रिटीशकालीन नाणी

    ही नाणी तब्बल दोन किलो वजनाची आहेत. ही नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ही नाणी एका गाठोड्यामध्ये होती.Aurangabad: Two kg British coins were found in Priyadarshini Park in CIDCO area


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : सिडको भागातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवन विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार वर्षभरापासून याठिकाणी काम सुरू आहे.दरम्यान सोमवारी (ता. २०) सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करताना ब्रिटीशकालीन नाणी सापडली.

    ही नाणी तब्बल दोन किलो वजनाची आहेत. ही नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ही नाणी एका गाठोड्यामध्ये होती.या नाण्यांचे वजन एक किलो ९५८ ग्रॅम एवढे वजन भरले.



    या नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र असून, १८५४, १८६१, १८८१ या काळातील ही नाणी आहेत.नाणी सापडताच रोहित स्वामी यांनी महापालिकेचे वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना माहिती दिली.

    गोरे यांनी कामाच्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान त्या ठिकाणी पाहणी केली असता ही नाणी ब्रिटीशकालीन असल्याचे निदर्शनास आले.ब्रिटीशकालीन नाणी सापडताच संरक्षक भिंतीचे काम थांबविण्यात आले. दरम्यान या ठिकाणी बंदोबस्त मिळावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाईल, असे वॉर्ड अभियंता गोरे यांनी सांगितले.

    Aurangabad: Two kg British coins were found in Priyadarshini Park in CIDCO area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस