• Download App
    औरंगाबाद : लस घेतली नाही त्यांना दारू देऊ नये ; सुरेश फुलारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी । Aurangabad: Those who have not been vaccinated should not be given alcohol; Demand of Suresh Phulare to the District Collector

    औरंगाबाद : लस घेतली नाही त्यांना दारू देऊ नये ; सुरेश फुलारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    सुरेश फुलारे यांनी या मागणीचे निवेदन काल रात्री ईमेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. Aurangabad: Those who have not been vaccinated should not be given alcohol; Demand of Suresh Phulare to the District Collector


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबाद पॅटर्न राबवला होता. यामध्ये जो लस घेणार नाही त्याला राशन , गॅस तसेच पेट्रोल दिलं जातं नव्हत.जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावरून सगळीकडे चर्चाना उधाण आले होते.आता यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती गोष्ट म्हणजे ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना दारू देण्यात येऊ नये. दरम्यान ही मागणी दोनदा लोकसभेची निवडणूक लढवलेले सुरेश फुलारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    सुरेश फुलारे यांनी या मागणीचे निवेदन काल रात्री ईमेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.फुलारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “एकिकडे लोकांना लस मिळत नाही आन दुसरीकडे आपण लस न घेणाऱ्यांचे राशन , पेट्रोल , गॅस बंद केले,.पण जरी राशन वगेरे बंद केले तरी लोकांना लस मिळत नाही.

    पुढे फुलारे यांनी लिहिलं आहे की , जर लस घ्यायची असेल तर जेवन करुन जावे लागते. जेवन केले नाही आन तशीच लस घेतली तर चक्कर येती.मग चक्कर येऊन पडल्यास याला जबाबदार कोण असणार.तसेच लस घेण्यासाठी गाडीवर दुर जावे लागते.मग यासाठी पेट्रोल मिळत नाही.



    शहरापासून 50 कि. मी अंतरावर चालत माणुस येईपर्यंत लस संपलेली असते, मग परत घरी गेला तर गॅस संपलेला असतो , मग तो आधिच उपाशी थकलेला असेल .गॅस नाही त्यामुळे लाकडे जाळुन चुल पेटवली तर परत प्रदुषण होऊन लोकांची प्रतीकार शक्ती कमी होते, त्यामुळे आपण या सर्व बाबीवर पुणर्विचार करावा.अस सुरेश फुलारे यांनी निवेदन पत्रात म्हटल आहे.

    पुढे ते म्हणाले की , लसीकरण जलद गतीने करण्यासाठी उपाय आहेत.यामध्ये ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना दारु देऊ नये, याविरुद्ध जो दारू देईल त्याचा परवाना रद्द करावा म्हणजे ते चेक करुनच दारु देतील व लसीकरनाचा वेग वाढेल. यामुळे कोणाची अडचन वाढणार नाही. तसेच या मागणीचा गांभिर्याने विचार करुन तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी सुरेश फुलारे यांनी केली आहे.

    Aurangabad : Those who have not been vaccinated should not be given alcohol; Demand of Suresh Phulare to the District Collector

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात