• Download App
    उद्यापासून औरंगाबादच्या शाळेची घंटा वाजणार !Aurangabad school bell will ring from tomorrow!

    उद्यापासून औरंगाबादच्या शाळेची घंटा वाजणार !

    आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून औरंगाबाद शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Aurangabad school bell will ring from tomorrow!


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंद होत्या. १ डिसेंबरनंतर शाळा सुरू होईल असे देखील सांगितले गेले होते. परंतु कोव्हीड मुळे पुन्हा शाळा सुरू होणार नाही असे मनपाने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून औरंगाबाद शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    याशिवाय कोविडच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरी कोविडचे नियम पाळूनच शाळा सुरू कराव्या लागणार आहे.तशा सूचना देखील शाळांना देण्यात आल्या आहेत.



    हे असतील नियम

    १)शाळा सुरू होताच पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना शाळेत मास्क लावूनच प्रवेश दिला जाणार आहे.
    २) विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करणे, विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जाणार आहे.
    ३) याशिवाय वर्गात सुरक्षित अंतर ठेवून शाळेतील जागेनुसार विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

    Aurangabad school bell will ring from tomorrow!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर; भारतात GST कमी केल्याने स्वस्ताईची लहर!!

    Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

    Suresh Dhas advice to the Hake : आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात; आक्रस्ताळेपणा बंद करा ! सुरेश धस यांचा हाकेंना सल्ला