• Download App
    आरएसएसच्या रुग्णालयात केवळ हिंदूवंरच उपचार का ?;  प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी नितिन गडकरींना विचारला होता प्रश्न; त्यांच्या प्रश्नावर गडकरींनी दिले होते हे सुंदर उत्तर । Aurangabad Dr.Hedgewar hospital inauguration program beautiful memories opened by centeral minister Nitin Gadkari in pune's one program

    आरएसएसच्या रुग्णालयात केवळ हिंदूवंरच उपचार का ?;  प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी नितिन गडकरींना विचारला होता प्रश्न; त्यांच्या प्रश्नावर गडकरींनी दिले होते हे सुंदर उत्तर

    औरंगाबाद येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालय उद्घाटन वेळी नामांकित उद्योगपती रतन टाटा यांचासोबत घडलेला किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सुंदरपणे उलगडून सांगितला. Aurangabad Dr.Hedgewar hospital inauguration program beautiful memories opened by centeral minister Nitin Gadkari in pune’s one program


    विशेष प्रतिनिधी

    पुणे  : पुण्यात गुरुवारी एका रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी भाषणात अनेक किस्से सांगिले. यावेळी त्यांनी औरगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बांधण्यात येणा-या एका रुग्णालयाचा किस्सा सांगितला. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे नितिन गडकरीही थोड्या वेळासाठी गोधंळून गेले होते.



    गडकरी म्हणाले, ‘मी जेव्हा शिवसेना-युतीच्या’ सरकारमध्ये होतो, तेव्हा औरंगाबाद येथे आरएसएसतर्फे एक रुग्णालय बांधण्यात आले होते. याच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना घेऊन येण्याची विनंती एका कार्यकर्त्याने केली होती. तेव्हा मी त्यांना या उद्घाटनासाठी येणार का असे विचारले, तेव्हा रतन टाटा यांनी या रुग्णालयात केवळ हिंदूवरच उपचार होतात का ? असा प्रश्न विचारला. तेव्हा मी गोंधळलो आणि असे का विचारले असे म्हणत प्रतिप्रश्न केला. यावर त्यांनी हे रुग्णालया आरएसएसचे आहे, त्या मुळे विचारले. यावर मी म्हणालो, ‘नाही, हे सर्व समाजासाठी आहे. आरएसएसमध्ये धर्मावर आधारित अशा प्रकारचा भेदभाव चालत नाही. यावेळी मी त्यांना अनेक गोष्टींबाबत माहितीही दिली. त्यामुळे ते खुश झाले होते असे गडकरी म्हणाले.

    या नंतर समाजासाठी काम करणा-या डॉक्टरांना उद्देशुुन गडकरी म्हणाले, मी जात पात मानत नाही. समाजातील उपेषितांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. असे झाल्यास ख-या अर्थाने समाज सुधरेल. यावेळी चर्चेदरम्यान मी त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या त्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.

    Aurangabad Dr.Hedgewar hospital inauguration program beautiful memories opened by centeral minister Nitin Gadkari in pune’s one program

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस