• Download App
    सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव; 56 कोटींच्या कर्जासाठी बँकेची कारवाई Auction of Sunny Deol's mumbai villa

    सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव; 56 कोटींच्या कर्जासाठी बँकेची कारवाई

    वृत्तसंस्था

    मुंबई: बॉलिवूड स्टार सनी देओलचा गदर २ सिनेमा चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. असं असताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सनी देओलच्या एका बंगल्याचा कर्जाचे हफ्ते न फेडल्यानं लिलाव होणार आहे. सनी देओल यानं एका बॅंकेतून मोठं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज घेताना त्यानं त्याचा जुहू इथला ‘सनी व्हिला’ हा बंगला तारण ठेवला होता. पण कर्जाचे हफ्ते काही काळापासून थकले आहेत. त्यामुळं बॅंकेनं आता या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेत, तशी जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. Auction of Sunny Deol’s mumbai villa

    काय आहे नेमकं प्रकरण?

    सनी देओल यानं बॅंक ऑफ बडोदा या बॅंकेकडून कोट्यवधींचं कर्ज घेतलं होतं. कर्ज घेताना त्यानं त्याच्या जुहू परिसरातला ‘सनी व्हिला’ हा बंगला तारण ठेवला होता. पण कर्जाची परतफेड न केल्यानं बॅंकेनं हा बंगला आता लिलावात काढण्याचा निर्णय घेतलाय. सनी देओलला बॅंकेचे ५६ कोटी रुपये देणं बाकी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं बॅंक आता या बंगल्याचा लिलाव करणार आहे. कर्ज आणि व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी बॅंकनं हा निर्णय घेतला असून जाहिरातीनुसार येत्या सप्टेंबर महिन्यात २५ तारखेला सनी देओलच्या या बंगल्याच लिलाव होणार आहे. या बंगल्याची किंमत लिलावात ५१.५४ लाख इतकी ठेवण्यात आली आहे.

    आर्थिक तंगी

    २०१६मध्ये सनी देओलनं घायल या गाजलेल्या सिनेमाच्या सिक्वलची निर्मिती केली होती. या सिनेमाच्या निर्मितीदरम्यान, त्याला मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. यावेळीही त्याचा सनी सुपर साउंड स्टुडिओ गहाण ठेवल्याचं म्हटलं गेलं होतं. पण सनी देओलच्या मॅनेजरनं या अफवा असल्याचं म्हटलं होतं.

    सनी देओलच्या गदर २ या सिनेमानं आतापर्यंत देश आणि परदेशात मिळून तब्बल ३०० कोटींच्या पुढं कमाई केली आहे. यामुळं तो आता या बंगल्याबद्दल काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Auction of Sunny Deol’s mumbai villa

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!