विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : माघशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास केली आहे… Attractive flower arrangement at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Maghshuddha Ekadashi
माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक आज पंढरीत दाखल झाले असून कार्तिक नंतर निर्बंध शिथील असणारी माघीवारी दुसरीच यात्रा होय. पंढरीत भाविकांची गर्दी वाढली असून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चार दर्शनमंडप उभारले आहेत सध्या दर्शन रांग दोन किलोमीटर पर्यंत पोहचली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क सक्तीचे असणार आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडपसह देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून सावळ्या विठु रूखमायचे रूप पाहून भाविक आनंदी आनंद होत आहे.
Attractive flower arrangement at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Maghshuddha Ekadashi
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कसले मागता, राजीवजींचे तुम्ही पुत्र असल्याचा पुरावा मागितला का? हेमंत बिस्वा शर्मा यांचा घणाघात
- मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सब रजिस्ट्रार ऑफिसचे कामकाज मंदगती
- सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा जयंत पाटील यांचे प्रतिपादन
- दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन
- SKIN TO SKIN TOUCH CASE : बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवल यांचा राजीनामा