जाणून घ्या कोण आहेत? आतापर्यंत एकूण चार जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
प्रतिनिधी
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलं आहे.सकाळी फिरण्यासाठी ते जात असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. Attack on MNS Sandeep Deshpande Mumbai Crime Branch arrested 2 accused Ashok Kharat and Kisan Solanki
हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आल्याचे सांगण्यात आले होते. संदीप देशपांडे यांना बेदम मारहाण करून हल्लेखोर तिथून पसार झाले होते. या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिक घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातले आणि संबंधित हल्लेखोरांना पकडण्याची मागणी केली होती. शिवाय राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले होते. परिणामी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि काल दोन जणांना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा आणखी दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मुंबईच्या भांडूप भागातून पोलिसांनी आज आणखी दोघांना अटक केली आहे. अशोक खरात आणि किसन सोळंकी अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांपैकी अशोक खरात हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवाय तो महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनशी संबंधित होता. याप्रकरणी पोलीस आणखी दोन जणांचा शोध घेत आहेत.
नेहमीप्रमाणे संदीप देशपांडे मॉर्निंग वॉककरिता शिवाजी पार्कमध्ये गेले होते. यावेळी अचानक काही मास्कधारी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. ते जखमी होऊन खाली पडले. या हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले.
Attack on MNS Sandeep Deshpande Mumbai Crime Branch arrested 2 accused Ashok Kharat and Kisan Solanki
महत्वाच्या बातम्या
- मेघालयात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी रस्सीखेच! भाजपाच्या संगमांना कोंडीत पकडण्याचा तृणमूल काँग्रेसचा डाव!
- ‘’जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या” आशिष शेलारांचं विरोधकांना खुलं आव्हान!
- उद्धव ठाकरेंकडून लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द??; आशिष शेलारांचा खळबळजनक दावा
- ‘’संजय राऊत हे वैफल्यग्रस्त, निराश व मानसिक तणावाखाली असल्याने ते…’’ आशिष शेलारांचे टीकास्त्र!