विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : सिंदखेड राजा येथे राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जिजाऊंच्या जन्मोत्सवाला आज सुरवात झाली.आज सकाळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीडॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी पूजन केले. यावेळी शासकीय पूजा झाली. जिजाऊ भक्त उपस्थित होते. जय जिजाऊ, जय जिजाऊच्या घोषणाने परिसर दणाणून गेला.At Sindkhed Raja Jijau’s birthday
दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा या वर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होत आहे. मराठा सेवा संघाच्या आवाहनानुसार फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे. राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर विद्युत रोषणाई केली आहे. घरीच राहून जिजाऊ यांना मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री शिंगणे यांनी केले आहे.
- जिजाऊंच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांकडून पूजन
- कोरोनामुळे जन्मोत्सव यंदा साध्या पद्धतीने
- फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत सोहळा
- राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर विद्युत रोषणाई