• Download App
    9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला... पण निवडणूक होणार?? Assembly Speaker Election ajit pawar ashok chavan meet governor

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला… पण निवडणूक होणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक परवा म्हणजे 9 मार्च रोजी घेण्याची परवानगी मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली आहे.Assembly Speaker Election ajit pawar ashok chavan meet governor

    विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा प्रलंबित विषय राहिला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत या निवडणुकीच्या मुद्द्यावरून मोठा संघर्ष होत राहिला आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी त्यामध्ये कायदेशीर प्रश्न उपस्थित करून गेल्या वेळी महाविकास आघाडीला झटका दिला आहे.

    या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेऊन विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक येत्या 9 मार्च रोजी घेण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, या निवडणूक प्रक्रियेविरोधात भाजपचे वरिष्ठ आमदार गिरीश महाजन मुंबई हाय कोर्टात गेले आहेत. त्यांना हायकोर्टाने 10 लाख रुपयांचे डिपॉझिट भरायला सांगितले आहे. ते डिपॉझिट भरले तर उद्या (मंगळवारी) हायकोर्ट त्यांच्या अर्जावर सुनावणी घेणार आहे.


    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानाला भाजपचे हायकोर्टात आव्हान!!; 10 लाख डिपॉझिट भरल्यावर मंगळवारी सुनावणी


    हायकोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी राज्यपाल महाविकास आघाडीला विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची परवानगी देतात की हायकोर्टाच्या निर्णयाची वाट बघतात? याला राजकीय दृष्ट्या देखील महत्त्व आहे.

    सुरुवातीला मतविभागणीच्या भीतीने महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक टाळली होती. त्यावेळी भाजपचा आग्रह होता. परंतु महाविकास आघाडीने नियमावलीत बदल करून अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा डाव खेळला आणि आता महाविकास आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक देण्यासाठी आग्रही झाली आहे. याच नियम बदला विरोधात गिरीश महाजन हायकोर्टात गेले आहेत.

    शिवाय परवानगीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात असल्याने येतो कोणत्या दिशेने लावतात, याला राजकीय दृष्ट्या फार महत्त्व आहे.

    Assembly Speaker Election ajit pawar ashok chavan meet governor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा