Assam Boat Collision : आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधात रात्रभर चाललेल्या कारवाईत 87 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, एकाचा मृत्यू झाला असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बोटीने प्रवासही केला. Assam Boat Collision 87 Passangers Rescued 2 missing and one dead Says CM Himanta Biswa Sarma
वृत्तसंस्था
जोरहाट : आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधात रात्रभर चाललेल्या कारवाईत 87 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, एकाचा मृत्यू झाला असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बोटीने प्रवासही केला.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, ’90 पैकी 87 लोकांची ओळख पटली आहे, ते रुग्णालयात किंवा घरी सुरक्षित आहेत. आतापर्यंत 1 मृत्यू झाला आहे. 2 जण बेपत्ता आहेत. शोध मोहीम सुरू आहे. खरं तर माजुलीला जाणारी एक खासगी बोट बुधवारी आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील निम्ती घाटाजवळ सरकारी बोटीला धडकल्यानंतर बुडाली. त्यानंतर बोटीवर असलेले 90 लोक पाण्यात बुडाले.
बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ
तीन अधिकारी निलंबित
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, अपघात प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे तीन अधिकारी अंतर्देशीय जल वाहतूक (IWT) विभागाचे आहेत. सीएम सरमा म्हणाले, ‘जोरहाट जिल्हा प्रशासनाला अपघातावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. जोरहाट आणि माजुलीला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्र्यांचा एक गट त्याच्या बांधकामाचा आढावा घेईल.
खासगी बोटी आजपासून बंद
याशिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आजपासून खासगी बोटींचे दळणवळण बंद केले जाईल, कारण त्यांच्याकडे सागरी इंजिन नाही. जर बोट मालकांना सिंगल इंजिनला सागरी इंजिनमध्ये रूपांतरित करायचे असेल, तर सरकार त्यांना 75% अनुदानासह 10 लाख रुपये देईल.
1.5 किमी अंतरावर सापडले बोटीचे अवशेष
जोरहाटचे उपायुक्त अशोक बर्मन यांनी सांगितले की, सुमारे 1.5 किमी अंतरावर ब्रह्मपुत्रा नदीत बोटीचे अवशेष सापडले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या जवानांनी उलटलेल्या बोटीचा तळ कापला, पण आत कोणीही नव्हते.
जोरहाटचे पोलीस अधीक्षक अंकुर जैन यांनी सांगितले की, अपघातानंतर बेपत्ता झालेले दोघेही जोरहाट आणि लखीमपूर जिल्ह्यातील होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ पाणबुडे त्यांच्या शोधात गुंतले आहेत आणि लष्करही सहकार्य करत आहे.
ते म्हणाले, “पाणबुडे गुरुवारी सकाळीही बोटीच्या आत गेले आणि तेथे त्यांना कोणताही मृतदेह सापडला नाही.” लष्कराच्या पाणबुड्यांनीही परिसरात शोध घेतला. बेपत्ता लोकांच्या शोधात हवाई दल हवाई सर्वेक्षण करणार आहे.
Assam Boat Collision 87 Passangers Rescued 2 missing and one dead Says CM Himanta Biswa Sarma
महत्त्वाच्या बातम्या
- छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता, दमानिया हायकोर्टात जाणार
- NEET PG 2021 : आता परीक्षा केंद्र बदलता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली याचिका
- NIRF Ranking 2021 : महाराष्ट्रातील एकही संस्था टॉप 10 मध्ये नाही, काय होते निकष, जाणून घ्या !
- Javed Akhtar Defamation Case : कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली
- NIRF Rankings 2021 : मिरांडा हाउस बेस्ट कॉलेज, इंजिनिअरिंगमध्ये IIT मद्रास टॉप, शिक्षण मंत्रालयने जारी केली NIRF रँकिंग