वृत्तसंस्था
हैदराबाद : सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद होते आणि आहेतच. पण महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींचे संसदेतले निलंबन, सावरकर मुद्दा या विषयावर स्पष्टीकरण दिले. Ashok chavan targets Shivsena Uddhav Thackeray over the issue of savarkar
अशोक चव्हाण म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसचा नैसर्गिक मित्र पक्ष पक्ष आहे. परंतु ज्यावेळी 2019 मध्ये महाराष्ट्रात विशिष्ट परिस्थिती उद्भवली, त्यावेळी शिवसेनेनेच काँग्रेसकडे सरकार बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. काही मुद्द्यांवर शिवसेनेची आमचे मतभेद होते आणि आहेत. त्यापैकी सावरकरांचा मुद्दा देखील मतभेदाचा राहिला आहे. पण त्यावेळी तो मुद्दा तेवढा पुढे आलेला नव्हता. त्यामुळे आम्ही शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारला आणि सरकारमध्ये काँग्रेस सामील झाली. पण सावरकर मुद्द्यावर शिवसेना आणि काँग्रेस यांचे मतभेद आजही कायम आहेत, असे उद्गार अशोक चव्हाण यांनी काढले.
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातले सरकार बनवण्यासाठी शिवसेनेनेच प्रस्ताव दिल्याचे सांगून शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणखी पंचाईत केली आहे. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत सावरकरांचा अपमान करू नका. तो सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला होता. परंतु अशोक चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून काँग्रेसने सावरकरांच्या मुद्द्यावर कुठलीही त्यांच्या दृष्टीने तडजोड केलेली नाही. ते मतभेद शिवसेनेशी कायम असल्याचा निर्वाळा दिला आहे. आता त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया येते??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Ashok chavan targets Shivsena Uddhav Thackeray over the issue of savarkar
महत्वाच्या बातम्या
- अभिमानापस्पद! भारतातील पहिले क्लोन वासरू, कर्नालच्या NDRI संस्थेच्या शास्त्रज्ञांची कमाल
- US School Shooting : अमेरिकेतील शाळेत गोळीबार, तीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू
- भारतीय नारी जगात भारी…! महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात अव्वल
- Amruta Fadnavis bribe blackmail case : ‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी