Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शनिवारी याच मुद्द्यावर महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. Ashok Chavan Says A review petition against the Supreme Court order on Maratha reservation is being considered
वृत्तसंस्था
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शनिवारी याच मुद्द्यावर महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विश्लेषण करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ही समिती 15 दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारचे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुनरावलोकन याचिकेवर विचार केला जात आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा समाजाला सरकारी नोकर्या व शिक्षणात आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा कायदा फेटाळून लावत घटनाबाह्य घोषित केले. एवढेच नव्हे, तर 1992च्या मंडल आयोगाच्या निर्णयाला (इंदिरा साहनी निकाल) मोठ्या पीठाकडे पाठवण्याची मागणीही कोर्टानेही नाकारली.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे दु:ख झाले आहे. ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावर सरकार मराठा समाजासोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पंतप्रधानांनी कलम 370 काढून टाकण्याचे दाखवलेले धाडस मराठा समाजाला आरक्षण देण्यासही दाखवावे, अशी मी विनंती करतो.
Ashok Chavan Says A review petition against the Supreme Court order on Maratha reservation is being considered
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या संदीप दीक्षितांनी काढले केजरीवाल सरकारचे वाभाडे, म्हणाले- त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा! वाचा सविस्तर…
- पंजाब सरकारचा भोंगळ कारभार उघड, सरकारी साठ्यातील हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शन सापडले भाक्रा कालव्यात
- Palanivel Thiagrajan : नास्तिकांच्या पक्षातला उत्कट देवीभक्त, जाणून घ्या तामिळनाडूच्या उच्चविद्याविभूषित नव्या अर्थमंत्र्यांबद्दल…
- कलम 370 वरून पाकचा यूटर्न, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्हाला चिंता 35 Aची!
- Corona Cases Updates : देशात कोरोनामुळे हाहाकार! 24 तासांत पहिल्यांदाच 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू, चौथ्यांदा नवीन रुग्णसंख्या 4 लाखांच्या पुढे