विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने काहीजणांकडून परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होत आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार होतोय. असाच एक प्रकार काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत घडला आणि त्यांनी थेट नितीन गडकरी यांना फोन करत मदत मागीतली .गडकरी यांनी भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी हा प्रकार सांगितला. Ashok Chavan calls Union Minister Nitin Gadkari
राज्यात ऑक्सजिनचा तुटवडा भासत असल्यामुळे बाहेर राज्यातून ऑक्सिजन आणला जात आहे. अशावेळी नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्याबाबत अशोक चव्हाण यांनी गडकरींना फोन केला. त्या ट्रान्सपोर्टरने चव्हाण यांच्याकडे १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर गडकरी यांनी रात्री १२-१ वाजता त्या ट्रान्सपोर्टला फोन केला आणि दवाब टाकत त्याला सांगितलं ही हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु.त्यानंतर ते टँकर जप्त करण्यात आले .
शोषण आणि संघर्ष दोन्ही टाळायचे आहे
रुग्णवाहिका, टँकर्स, हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकलवाले यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन कुठेही गरीब माणसाची पिळवणूक करता कामा नये. पण आता ऑडिटिंग करणं, रेड मारणं, चौकश्या करणं, डॉक्टरांशी भांडण करणं याची वेळ नाही. म्हणजेच आपल्याला लोकांचं शोषण होता कामा नये याचीही काळजी घ्यायची आहे आणि संघर्षही टाळायचा आहे. अशाप्रकरचा संघर्ष करुन आहे ती व्यवस्थाही बंद करणं हे समाजासाठी उपयुक्त ठरणार नाही, असं गडकरी यांनी स्पष्ट केले आहे .
Ashok Chavan calls Union Minister Nitin Gadkari
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंवर पक्षश्रेष्ठी नाराज : एकनाथ शिंदे-संजय राऊत यांना मुख्यमंत्री केले असते तर …शरद पवारांची खंत!
- शेतकरी आंदोलनात सहभागी महिलेवर सामूहिक बलात्कार, टिकरी बॉर्डरवरील सहा आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल
- कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कुटुंबच उध्वस्त, पुण्यात पत्नी, बालकाची हत्या करून युवकाची आत्महत्या
- हत्येच्या प्रकरणात आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार, लूक आऊट नोटीस जारी