• Download App
    ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार! Ashish Shelars response to Uddhav Thackerays criticism

    ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

    ‘’मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…’’ असंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना (ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळाव्यात बोलताना भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. त्या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलारांनीही प्रत्युत्तर दिले आहे. Ashish Shelars response to Uddhav Thackeray’s criticism

    आशिष शेलार म्हणाले, ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…त्यांनी साठ वर्षात काय केले? ‘’

    याचबरोबर ‘’तुम्ही मुंबईवर २५ वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा? आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे.त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!!’’ असंही शेलार म्हणाले.

    काय म्हणाले उद्धव ठाकरे? –

    ‘’मुंबईत गेटवे ऑफ इंडिया व्हिक्टोरिया टर्मिनस मुंबई महापालिकेची बिल्डिंग इंग्रजांनी बांधली. आपण बांधली नाही. नेहरूंची सगळी वर्षे विसरून जा. पण वाजपेयी नंतर तुम्ही काय केले??, मुंबईत काय बांधले??’’ ते सांगा असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला मारला.

    याचबरोबर “आता भाजपात राम राहिला नाही, जे आहेत ते सगळे ‘आयाराम’ आहेत. पण आमच्या हृदयात असलेला राम तुम्ही काढू शकत नाही. भाजपा हा आता आयारामांचा पक्ष झाला आहे. तुम्ही राम मंदिर बांधाच पण आता तुम्ही आयाराम मंदिर बांधलं आहे. त्याचं काय करायचं? परिणामी भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना आयारामांची पूजा करावी लागतेय, याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही.” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

    Ashish Shelars response to Uddhav Thackerays criticism

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला