बार्शीतील घटनेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले आहेत.
प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित मुलीचा फोटो ट्वीवटरवर शेअर करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी त्यांनी प्रत्युत्तर देत, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवल्याचे दिसत आहे. Ashish Shelar reply to Sanjay Raut who targeted Devendra Fadnavis over the Barshi incident
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ही घटना आहे. एका अल्पवयीन मुलीवर आगोदर बलात्कार आणि नंतर तिच्या कुटुंबीयांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. पीडित मुलीवर अद्यापही उपचार सुरु आहेत. तर या घटनेचे पडसाद विधान परिषदेमध्येही उमटले आहेत. यावरून संजय राऊतांनी राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत, फडणवीसांवर निशाणा साधला.
संजय राऊत काय म्हणाले? –
‘’देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.’’ असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे आणि सोबत रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या पीडित मुलीचा फोटोही शेअर केला आहे.
आशिष शेलारांचा पलटवार –
संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना आशिष शेलारांनी म्हटले, ‘’प्रिय, संजुभाऊ, ६ मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करण्यात आली. याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना ८ मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.’’
याशिवाय, ‘’या घटनेची माहिती मिळताच, बार्शी पोलिसांनी सदर युवतीला वैद्यकीय मदत मिळवून दिली. तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता तिच्या प्रकृतीत बर्यापैकी सुधारणा झाली आहे. हे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे, आरोपींचा बचाव करणारे महाविकास आघाडीचे नाही.!’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.
Ashish Shelar reply to Sanjay Raut who targeted Devendra Fadnavis over the Barshi incident
महत्वाच्या बातम्या
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!
- फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??
- विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!
- नवीन पेन्शन योजनेत शिंदे – फडणवीस सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय