• Download App
    आषाढी वारीची नियमावली जाहीर; देहू आणि आळंदी पालख्यांच्या प्रस्थानासाठी प्रत्येकी 100 वारकऱ्यांना परवानगी। Ashadhi Wari rules announced; Permission of 100 Warakaris for departure of Two palanquins

    आषाढी वारीची नियमावली जाहीर; देहू आणि आळंदी पालख्यांच्या प्रस्थानासाठी प्रत्येकी 100 वारकऱ्यांना परवानगी

    वृत्तसंस्था

    पुणे : आषाढी वारीतील मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या वारी सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. Ashadhi Wari rules announced; Permission of 100 Warakaris for departure of Two palanquins



    पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. वारीचे आयोजन करताना कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे.

    वाखरी येथून १.५ किमी पायी वारी

    मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोचेल. तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास परवानगी दिली आहे. सर्व मानाच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.

    Ashadhi Wari rules announced; Permission of 100 Warakaris for departure of Two palanquins

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!