Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान या वर्षी विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मिळाला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी काढून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. केशव कोलते हे वर्ध्याचे रहिवासी असून ते 1972 पासून पंढरीची वारी करतात. तसेच मागच्या 20 वर्षांपासून ते विठ्ठल मंदिरात वीणेकरी म्हणूनही सेवा देत आहेत. Ashadhi Ekadashi 2021 Wardha Couple selected For Viththal Mahapuja With CM Thackeray
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान या वर्षी विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मिळाला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी काढून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. केशव कोलते हे वर्ध्याचे रहिवासी असून ते 1972 पासून पंढरीची वारी करतात. तसेच मागच्या 20 वर्षांपासून ते विठ्ठल मंदिरात वीणेकरी म्हणूनही सेवा देत आहेत.
कोरोना महामारीमुळे गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही पायी वारी रद्द झालेली आहे. या कारणामुळे दर्शन रांगेतील भविकांतून मानाचा वारकरी निवडता येत नाही. म्हणूनच मंदिरात सेवा देणाऱ्या भाविकांमधून मानाचा वारकरी निवडण्यात येत आहे. यावर्षी हा मान कोलते दांपत्याला मिळाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांना आषाढी एकदशीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा करता येणार आहे.
दरम्यान, या वर्षी 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मानाच्या 10 पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली असून आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासासही बंदी झाालण्यात आली आहे. आज दुपारी 2 वाजेपासून संचारबंदीला सुरू होणार असून 25 जुलैपर्यंत हे आदेश कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Ashadhi Ekadashi 2021 Wardha Couple selected For Viththal Mahapuja With CM Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल; गृह राज्यमंत्री देसाईंचे वक्तव्य
- विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळून 5 जण ठार, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
- Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा कहर, चेंबूरमध्ये घरांवर भिंत कोसळून 14 जण ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती
- शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा
- भविष्यात देशातील १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालणार, पियुष गोयल यांनी सांगितली केंद्र सरकारची योजना