बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. Aryan Khan : हुश्शऽऽऽ…अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर ; ‘मन्नतवर दिवाळी’ Aryan Khan walks out of Mumbai’s Arthur Road Jail few weeks after being arrested in drugs-on-cruise case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे.
आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
Aryan Khan walks out of Mumbai’s Arthur Road Jail few weeks after being arrested in drugs-on-cruise case
महत्त्वाच्या बातम्या
- रजनीकांत यांची शस्त्रक्रिया यशस्वी , थोड्याच दिवसात मिळेल डिस्चार्ज
- Azadi ka Amrit Mahotsav : 75 𝑪𝑹𝑬𝑨𝑻𝑰𝑽𝑬 𝑴𝑰𝑵𝑫𝑺 𝑶𝑭 𝑻𝑶𝑴𝑶𝑹𝑹𝑶𝑾 … सृजनशील कलावंतांना मोदी सरकारची अनोखी संधी;देशभरातून मागवले अर्ज
- आर्यनसाठी जुही चावला झाली जामीनदार, वाचा शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री ?
- पाकिस्तानचा सलग तिसऱ्यांदा विजय; अफगाणिस्तानचा पाच गडी राखून केला पराभव