विशेष प्रतिनिधी
मुंबई : ड्रग्स प्रकरणात अटक झालेला आर्यन खानला कालची संपूर्ण रात्र एनसीबीच्या कस्टडीत काढावी लागली आहे. दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान हा देखील आपल्या मुलाच्या अटकेप्रकरणी सतत अपडेट घेत आहे. सलमान आणि शाहरुख या दोन अभिनेत्यांमधील वाद सर्वांना चांगलाच माहिती आहे. दोघांमधून विस्तव देखील जात नाही मात्र या कठीण काळात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा शाहरुखला भेटण्यासाठी थेट त्याच्या घरी गेला होता. काल (3 ऑक्टोबर) उशिरा सलमान हा शाहरुखच्या मन्नत या बंगल्यात गेला होता. आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख आणि गौरी हे पूर्णपणे खचून गेल्याने त्यांना धीर देण्यासाठी सलमान तिथे गेला असल्याचं बोललं जात आहे. Aryan Khan arrested in drug case; Salman on ‘Mannat’ to support Shah Rukh Khan
जेव्हा सलमान खान हा शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याजवळ गेला तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला मात्र सलमान काहीही न बोलता थेट बंगल्यात शिरला. रात्री उशिरा झालेल्या या भेटीत नेमकं काय बोलणं हे मात्र समजू शकलेलं नाही.
शाहरुख खानचं कुटुंब हे प्रचंड तणावाखाली असल्याने सलमान आपल्या मित्राला आधार देण्यासाठी गेला असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. परंतु दोघांपैकी कोणत्याही कलाकाराने या भेटीबाबत अधिकृत निवेदन दिलेले नाही.
ड्रग्स केसमध्ये काय सुरु आहे?
ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीने आर्यन खानला काल (3 ऑक्टोबर) चौकशीनंतर अटक केली होती. आर्यनचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचे तपासात उघड झाल्याचा आरोप एनसीबीकडून करण्यात आला होता. तसेच त्याने ड्रगचे सेवन केल्याचं देखील आरोपात म्हटलं होतं. जेव्हा एनसीबीने आर्यनचा फोन जप्त केला तेव्हा त्यांना अनेक ठोस पुरावे मिळाले. त्याच पुराव्याच्या आधारे आर्यनला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याला या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण गेलं. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करुन आर्यनला मुंबईतील किला कोर्टासमोर नेण्यात आलं. जिथे कोर्टाने त्याच्यासह तिघांना 1 दिवसाची NCB कस्टडी सुनावली.
Aryan Khan arrested in drug case; Salman on ‘Mannat’ to support Shah Rukh Khan
महत्त्वाच्या बातम्या
- सिमी गरेवालने घेतलेल्या मुलाखतीत जयललिता यांनी कोण कोणत्या गोष्टींचा खुलासा केला होता?
- पुढच्या वर्षांपासून सिक्कीममध्ये बाटलीबंद पाणी विकण्यावर बंदी; प्लास्टिक बाटल्या होणार हद्दपार
- मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान, अजित पवार यांची आर्यन खान अटकेवर प्रतिक्रिया
- कॉंग्रेस नेतृत्वाकडून काही फायद्यासाठी राष्ट्रीय हिताशी तडजोड, पंजाबमधील घडामोडींवरून पियुष गोयल यांचा निशाणा