जामिनावर बाहेर आलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात पोहोचला. शाहरुखचा बॉडीगार्डही त्याच्यासोबत होता. आर्यन खान जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार दर शुक्रवारी त्यांना सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरुंगातून बाहेर आला होता. aryan khan appears before narcotics control bureau to mark his weekly presence in drugs on cruise case
वृत्तसंस्था
मुंबई : जामिनावर बाहेर आलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात पोहोचला. शाहरुखचा बॉडीगार्डही त्याच्यासोबत होता. आर्यन खान जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार दर शुक्रवारी त्यांना सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरुंगातून बाहेर आला होता.
या अटींसह मिळाला आर्यनला जामीन
- आर्यन खान तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय मुंबई सोडू शकत नाही.
- दर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत NCB कार्यालयात येऊन हजेरी द्यायची आहे.
- त्याला इतर आरोपींच्या संपर्कात राहता येणार नाही.
- तपासाशी संबंधित गोष्टी मीडिया किंवा सोशल मीडियावर शेअर करू शकत नाही.
- आर्यनला त्याचा पासपोर्ट स्पेशल एनडीपीएस कोर्टात जमा करायचा आहे.
- न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही.
- कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला विशेष न्यायाधीशांकडे अर्ज करण्याचा अधिकार असेल.
NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रूझवर छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले होते. याच आरोपाखाली आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सर्वांना अटक करण्यात आली. एनसीबीने याप्रकरणी सुमारे 20 जणांना अटक केली असून त्यापैकी अनेक जण जामिनावर बाहेर आले आहेत.
aryan khan appears before narcotics control bureau to mark his weekly presence in drugs on cruise case
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न