• Download App
    नितीन देसाई यांच्या आत्महत्या नंतर ' दादाचं आणि माझं नातं' असं म्हणत..|Art director Nitin sardesai

    नितीन देसाई यांच्या आत्महत्या नंतर ‘ दादाचं आणि माझं नातं’ असं म्हणत..

    अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची भावनिक पोस्ट व्हायरल.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आपल्या कला कौशल्याने अनेक सिनेमांमध्ये नेपथ्य जिवंत करणारे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत मधील आपल्याच स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. Art director Nitin sardesai

    नितीन देसाई यांनी आपल्या कार्यकर्ते हिंदीसह मराठीतल्या अनेक दिग्गजांसोबत काम केल आहे.



    त्यामुळे देसाई यांचं अनेक कलाकारांसोबत एक वेगळंच आणि जिव्हाळ्याचं नातं तयार झालं होतं. त्यांच्या जाण्याने आज सगळेच कलाकार आपापल्या समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. आता त्यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

    मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर त्यांचा आणि नितीन देसाई यांचा एक बिहाइंड द सीन फोटो शेअर करत लिहिलं, “दादांचं आणि माझं नातं या फोटोमध्ये दिसतंय अगदी तसंच होतं ! त्यांनी निर्माण केलेल्या ‘राजा शिवछत्रपती’मध्ये जिजाबाई साहेबांची भूमिका पहिल्यांदा केली आणि त्यानंतर ‘रमा माधव’च्या दिग्दर्शनाच्या वेळेला ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अतिशय गुणी असा मनस्वी कलावंत, कोणत्याही संकटात न डगमगणारा माणूस…फार मोठा धक्का…”

    Art director Nitin sardesai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bhujbal : आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?, भुजबळांचा पलटवार

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप