पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी तसेच सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. Army soldier commits suicide due to wife’s harassment
विशेष प्रतिनिधी
पुणे : पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी तसेच सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, सध्या.रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. शेलार लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयात नियुक्तीस होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी सैनिक आवासातील खोलीत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. शेलार यांचा भाऊ केशव नानाभाऊ शेलार यांनी यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शेलार यांची पत्नी अश्विनी आणि सासरच्यांवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलार यांचा गेल्या वर्षी अश्विनी पाटीलशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. अश्विनीने शेलार यांना त्रास देऊन कौटुंबिक हिंसाचार कायद्यावन्ये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तिच्या धमकी तसेच त्रासामुळे शेलार यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ केशव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Army soldier commits suicide due to wife’s harassment
महत्त्वाच्या बातम्या
- डीएसके’ फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत
- Hijab controversy : राष्ट्रवादीचे दोन मंत्री दिलीप वळसे-पाटील – नवाब मलिक यांच्या वक्तव्यांमध्ये परस्पर विरोध!!
- WWE रेसलर ‘द ग्रेट खली’चा भाजपमध्ये प्रवेश, प्रवेशानंतर म्हणाले- मोदींच्या रूपाने देशाला योग्य पंतप्रधान मिळाला!