• Download App
    जागतिक बँकेच्या शैक्षणिक सल्लागारपदी रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती । Appointment of Ranjit Singh Disley as World Bank Educational Advisor

    जागतिक बँकेच्या शैक्षणिक सल्लागारपदी रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

    वृत्तसंस्था

    सोलापूर : देशात प्रथमच ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांची आता जागतिक बँकेने शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीसाठी त्यांची नेमणूक झाली आहे. Appointment of Ranjit Singh Disley as World Bank Educational Advisor

    जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.  याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतू आहे. विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.



    पहिलेच भारतीय शिक्षक

    युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने ‘ग्लोबल टीचर प्राईज’ सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला होता. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते. दरम्यान, रणजितसिंह डिसलेयांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप, असे नाव आहे. 400 युरोंची ही शिष्यवृत्ती सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

    Appointment of Ranjit Singh Disley as World Bank Educational Advisor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस