कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात असताना अहमदनगर जिल्ह्याने चिंता वाढविली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल आठ हजार बालके कोरोनाबाधित झाली आहे.Anxiety in Ahmednagar district, corona infection in eight thousand children
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात असताना अहमदनगर जिल्ह्याने चिंता वाढविली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल आठ हजार बालके कोरोनाबाधित झाली आहे.
देशात सध्या राजस्थानमध्ये सर्वाधिक मुले कोरोनाबाधित होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.,अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावले आहेच.
रुग्णवाढीत राज्यात अव्वल राहिलेला जिल्हा आता कुठे रुग्णवाढीच्या आकडेवारीत कमी झाला आहे.प्रशासनाच्या प्रयत्नानंतर मागील काही दिवसांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी झाली. परंतु लहान मुलांच्या बाबतीत जिल्ह्यासाठी एक चिंताजनक बाब आकडेवारीमधून समोर आली आहे.
तिसºया लाटेमधे मुलांना धोका होईल असे अंदाज बांधत असतानाच दुसऱ्या लाटेतही लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याचं नगर जिल्ह्यात आढळून आलं आहे. मे महिन्यात गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यात एकूण ७७ हजार ९९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्या ८ हजार ८८१ आहे. एप्रिलमध्ये लहान मुलांना लागण होण्याचे प्रमाण साडेनऊ टक्के होते. हे प्रमाण मे महिन्यात ११ टक्के झाले आहे.
एप्रिल महिन्यात १८ वर्षांखालील ७ हजार ६०७ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण साडे नऊ टक्के होतं.
मे महिन्यात गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यात एकूण ७७ हजार ९९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्या ८ हजार ८८१ आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ११ टक्के आहे.
यामध्ये एक वर्षाच्या आतील रुग्णांची संख्या ८५ असून १ ते १० या वयोगटातील रुग्ण संख्या २ हजार ६९४ आहे. ११ ते १८ या वयोगटातील रुग्णांची संख्या ६ हजार १०२ आहे. दोन महिन्यांपासून दररोज बालरोग तज्ज्ञांकडे येणा? यांपैकी दहा ते बरा लहान मुले कोरोना बाधित आढळून येत आहेत.
मात्र, त्यातील ८० टक्के मुलं लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत.अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले, मोठ्या प्रमाणात मुलांना कोरोनाची बाधा होत असून ही चिंताजनक बाब आहे.
Anxiety in Ahmednagar district, corona infection in eight thousand children
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावरील उपचारासाठी बॅँका देणार वैयक्तिक कर्ज
- चीनचे नवे कुटुंब नियोजन धोरण जाहीर ; आता तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी
- ओबीसी आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले; नंतर फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले
- BIG BREAKING NEWS : देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर; शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट
- सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या विरोधकांना दिल्ली उच्च न्यायालयाची सणसणीत चपराक; पीआयएलचा गैरवापर केल्याबद्दल ठोठावला १ लाखांचा दंड