• Download App
    मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर|Announcement of 'Marathi balkumar sahitya' Literature awards

    मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या 2020-21 या वर्षाच्या बाल वाड्मय पुरस्काराची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी शनिवारी केली. यावेळी खजिनदार डॉ. दिलीप गरूड, कार्यवाह मुकुंद तेलीचरी, सहकार्यवाह सुनील महाजन उपस्थित होते.Announcement of ‘Marathi balkumar sahitya’ Literature awards

    विज्ञानविषयक पुरस्कार डॉ. सुनील विभुते यांच्या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा या पुस्तकाला जाहीर झाला आहे. बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या कोरोना राक्षस या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या समूदादा या पुस्तकाला,



    शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंडी यांच्या भाषेची भिंगरी या पुस्तकाला, बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या हाडेल हप्पी, जादूची झप्पी या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार प्रा. सुहास बारटक्के यांच्या बांधामधला धामण या पुस्तकाला जाहीर झाला आहे.

    तसेच मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या मुग्धाच्या कविता या पुस्तकाला व पीयुष गांगुर्डे याच्या काळजातली माया पुस्तकाला दिला जाणार आहे.

    सुनील महाजन म्हणाले, पुरस्कारासाठी राज्यभरातून 150 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. लवकरच कोरोना नियमांचे पालन करून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

    Announcement of ‘Marathi balkumar sahitya’ Literature awards

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!