विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील ठाकरे पवार सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बेनामी रिसॉर्ट केसची सुनावणी 30 मार्च रोजी होणार असल्याचे ट्विच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. Anil Parab Resort: Anil Parab’s anonymous resort case to be heard on March 30; Kirit Somaiya’s tweet
नवाब मलिक तुरुंगात गेले. आता पुढचा नंबर अनिल परब यांचा, असे ट्विट यापूर्वीच किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील अनिल परब यांच्या साई रिसॉर्टचे फोटो शेअर करत या रिसॉर्टची केस 30 मार्च रोजी सुनावणीला येणार असल्याचे म्हटले आहे.
आत्ता अनिल परबांचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा….चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
त्याच वेळी नील सोमय्या यांच्यावर केसच होऊ शकत नाही, अशा आशयाची बातमी सामनानेच दिल्याचा फोटो देखील किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. वाह !! राऊत साहेब…. ठाकरे सरकार म्हणतेय नील सोमैया विरूद्ध कोणतीही चौकशी नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनिल परबांच्या विरोधात आता फौजदारी प्रक्रिया सुरु झाली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायदाच्या अंतर्गत तक्रार क्र. १२/२०२२ कलम १५, ७, १९० अन्वये रत्नागिरी न्यायालयात दावा दाखल केला आहे. बेकायदेशीर बांधकाम,बेनामी संपत्ती, मनी लाँडरिंग कव्हर करण्यात आले आहे, असे ट्विटही किरीट सोमय्या यांनी केले आहे.
Anil Parab Resort: Anil Parab’s anonymous resort case to be heard on March 30; Kirit Somaiya’s tweet
महत्त्वाच्या बातम्या
- यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु; कारवाईसंबंधी विधानसभेत चर्चा
- रशियन सैन्याची अपंग देखभाल केंद्रावरही क्षेपणास्त्रे २६७ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
- Fadanavis pendrive Bomb : केंद्रीय तपास यंत्रणांवरचे शरद पवारांचे आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनीच फेटाळले!!; कसे ते वाचा!!
- अजित पवार यांचे बजेट म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ, सदाभाऊ खोत यांची टीका