प्रतिनिधी
नागपूर : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात घाई झाली असे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे.Anil Deshmukh’s resignation in a hurry
परंतु, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यानंतर पश्चात बुद्धीने “घाई झाली”, असे सांगत संजय राऊत यांनी शरद पवार यांची चूक दाखवून दिली की अनिल देशमुखांच्या जखमेवरची खपली काढली…??, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसंपर्क अभियानानिमित्त नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात घाई झाल्याचे विधान केले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही ठाकरे सरकारची चूक होती, असे धक्कादायक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसंपर्क अभियानानिमित्त नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले राऊत?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे देशमुखांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय हा त्यावेळी घाई-घाईत घेण्यात आला. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं ही चूक होती, असे विधान यावेळी संजय राऊत यांनी केले.
मी सुद्धा पीडित आहे
ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी देशमुखांच्या घरावर छापे घातले, ते आम्हाला माहीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सध्याच्या काळात खुळखुळा झाला आहे. ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही, त्या राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांकडून कुठल्याही कारवाया होत नाहीत. पण जिथे भाजपची सत्ता नाही, तिथे मात्र सरकारमधील नेत्यांच्या मागे कारवायांचा ससेमिरा लावण्यात येत आहे. मी देखील यामधील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
आम्ही वाकणार नाही
भाजपने सध्या सुडाचे राजकारण सुरू केले आहे. पण दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. खोटी प्रकरणे मागे लावून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पण आम्ही अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा प्रश्न तर सोडाच, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
– आरोप पवारांवर, उत्तर राऊतांचे
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही यावरून आधीच शरद पवार यांच्यावर धार्मिक आधारावर भेदभाव केल्याचा आरोप आहे आता त्यापुढे जाऊन अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात घाई झाल्याचे वक्तव्य करून संजय राऊत यांनी देशमुख यांच्या जखमेवरची खपली काढल्याचे मानण्यात येत आहे.
Anil Deshmukh’s resignation in a hurry
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : १२६ वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदीही झाले नतमस्तक, योगासाठी मिळाला पद्मश्री पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल
- उत्तराखंडमध्ये धामी, गोव्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, जाणून घ्या कधी घेणार दोन्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ
- चिंताजनक : बायडेन यांच्या वक्तव्याने रशियाचा संताप, अमेरिकेच्या राजदूताला बजावले समन्स, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला