Sunday, 11 May 2025
  • Download App
    अनिल देशमुखांचे चौकशीत असहकार्य; कोर्टाने वाढवली 16 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी!!|Anil Deshmukh's non-cooperation in interrogation; Court extends CBI custody till April 16

    अनिल देशमुखांचे चौकशीत असहकार्य; कोर्टाने वाढवली 16 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : सुमारे 400 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चौकशीत सहकार्य करत नाहीत म्हणून सीबीआय विशेष कोर्टाने त्यांची कोठडी 16 एप्रिल पर्यंत वाढवली आहे त्यांच्या बरोबरच कुंदन शिंदे संजीव पलांडे आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची देखील कोठडी वाढविण्यात आली आहे.Anil Deshmukh’s non-cooperation in interrogation; Court extends CBI custody till April 16

    अनिल देशमुख हे चौकशी दरम्यान गप्प राहतात. ते चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तरचौकशी दरम्यान गप्प राहण्याचा अनिल देशमुख यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद त्यांचे वकील विक्रम चौधरी यांनी सीबीआय कोर्टात केला. परंतु सीबीआय कोर्टाने तो मान्य केला नाही.



    400 कोटींच्या घोटाळ्यात खूप बडी बडी नावे गुंतली आहेत 1 – 2 वेळा चौकशी करून या प्रकरणातले तपशील बाहेर येणार नाहीत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे अनिल देशमुख यांना सीबीआय कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यावर अनिल देशमुख यांचे वय झाले आहे. त्यांना विविध आजार आहेत. त्यांच्या खांद्यावर आता शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सीबीआय कोठडीची मुदत वाढवू नये, असा युक्तिवाद विक्रम चौधरी यांनी केला. परंतु सीबीआय कोर्टाने तो अमान्य केला आहे.

    सचिन वाझेच्या वकीलांनी देखील 400 कोटींच्या घोटाळ्यात मोठमोठे नेते गुंतले आहेत. त्यांची नावे सहज बाहेर येणार नाहीत. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे, असाच युक्तिवाद केला. अनिल देशमुख आणि अन्य आरोपींना सीबीआय कोठडी वाढवून न देता ईडी कोठडीत पाठवले तरी त्यांची चौकशी सुरूच राहील, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केल्यानंतर सीबीआय कोर्टाने 16 एप्रिल पर्यंत सर्वांची कोठडीची मुदत वाढवली आहे.

    Anil Deshmukh’s non-cooperation in interrogation; Court extends CBI custody till April 16

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ