विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात रविवारी पहिली अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) संतोष शंकर जगताप याला ठाणे येथून अटक केली आहे. न्यायालयाने संतोष जगतापला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.Anil Deshmukh’s mediator in the ransom case was handcuffed by the CBI
सीबीआयने रविवारी संतोष शंकर जगताप याला अटक केली आहे. जगताप हे मध्यस्थ असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर देशमुख अडचणीत आले आहेत. गोपनीय कागदपत्रे लीक प्रकरणी सीबीआयने नुकतेच अनिल देशमुखांच्या काही ठिकाणांवर छापेही टाकले होते.
केंद्रीय तपास यंत्रणेने देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा शोध घेण्यात आला होता. 2 सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेने देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली होती.
सीबीआयचे प्रवक्ते आर. सी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार. ‘सीबीआयने आपले उपनिरीक्षक, नागपुरातील वकील आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध बेकायदेशीर लाचखोरीसह काही आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने उपनिरीक्षकाला अटक केली आहे तर वकिलाची चौकशी सुरू आहे.
तत्कालिन सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याच्या माध्यमातून 100 कोटींच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली.
मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपए दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून वसूल करण्याचं टार्गेट दिले होते असा आरोप त्यांनी केला.
Anil Deshmukh’s mediator in the ransom case was handcuffed by the CBI
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
- चीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार
- आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
- विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार