• Download App
    अनिल देशमुखांच्या चुलत भावाच्या कंपन्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बेकायदेशीर रक्कम वाटप; ईडीला संशय । Anil Deshmukh's cousin's companies illegally distribute money to NCP leaders; Eddie suspects

    अनिल देशमुखांच्या चुलत भावाच्या कंपन्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बेकायदेशीर रक्कम वाटप; ईडीला संशय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार – सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) १०.९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहार प्रकरणी चौकशी करत आहे. हा व्यवहार ईडीला संशयास्पद वाटत आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमांतून बेकायदेशीर रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही देण्यात आली आहे, असाही ईडीला दाट संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.  Anil Deshmukh’s cousin’s companies illegally distribute money to NCP leaders; Eddie suspects

    सत्यजित देशमुखांची कंपनी टार्गेटवर

    या प्रकरणी ईडीकडून प्रामुख्याने इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि. या कंपनीची चौकशी केली जात आहे. ही कंपनी सत्यजित देशमुख यांच्या मालकीची आहे. ही कंपनी वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून दुबईच्या लुईस बर्जर कंपनीसोबत सह कंत्राटदार म्हणून काम करत आहे. तसेच ही कंपनी मुंबई कोस्टल रोड आणि मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठीही उप-सल्लागार आहे.



    इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि.या कंपनीला या तीन प्रकल्पांसाठी 2018 ते 2020 दरम्यान उप-सल्लागार नियुक्त केले होते. मात्र सत्यजित देशमुख यांनी इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि. ही कंपनी कोणताही प्रकल्पासाठी सल्लागार नव्हती, असे निवेदनात म्हटले आहे. ईडी याच तीन प्रकल्पांमध्ये इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि. या कंपनीने १०.९ कोटी रुपयांचा व्यवहार केल्याप्रकरणी चौकशी करत आहे.

    Anil Deshmukh’s cousin’s companies illegally distribute money to NCP leaders; Eddie suspects

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ