वृत्तसंस्था
मुंबई : रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करण्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कार्यालयात येऊन चौकशीला सामोरे जाण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे.Anil Deshmukh again refused to attend ED office for inquiry
अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना ईडीने सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते. असे असताना सुद्धा ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख हे दोघेही सोमवारी ईडी कार्यलयात हजर राहणार नसल्याचे, देशमुख यांनी वकिलामार्फत दोन पानी पत्र लिहून ईडीला कळवले आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई पासून दिलासा मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, त्यानंतर मी ईडीच्या चौकशीला स्वतःहून हजर होईन, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
याआधीही होते गैरहजर
याआधीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या २ खासगी सचिवांना ईडीने अटक केल्यानंतर, ईडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा समन्स बजावून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश 26 जून रोजी दिला होता.
मात्र त्यावेळीही देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी ईडीला पत्र पाठवून देशमुख येणार नसल्याचे कळवले होते. ईडीने नोटीस पाठवताना सोबत कोणत्या केससाठी बोलावले आहे, हे कळवले नाही. त्याविषयी माहिती द्यावी, अशी मागणी त्यावेळी केली होती.
Anil Deshmukh again refused to attend ED office for inquiry
महत्त्वाच्या बातम्या
- लस घेणाऱ्या नागरिकांना रोख डॉलर्स तर कुठे चक्क मोटार किंवा गायीचे बक्षीस
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू
- सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार
- पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा