वृत्तसंस्था
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १७ कोटी रुपयांचे उत्पन्न दडविल्याचा आरोप होत आहे. नागपूरसह विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये ही बाब उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. Anil deshmukh accused of hiding income of rs 17 crore
प्राप्तीकर विभागाने १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संस्थांवर छापे टाकले होते. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शोध मोहिमेतील पुराव्यांवरून स्पष्ट होते की सुमारे १७ कोटी रुपयांचे उत्पन्न दडविण्यात आल्याचे नमुद आहे
प्राप्तीकर विभागाने नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये ३० ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण केले होते. या कारवाई दरम्यान, अनेक कागदपत्रे आणि इतर पुरावे सापडले.
या समूहाच्या ट्रस्टला दिल्लीतील कंपन्यांकडून ४ कोटी रुपये बनावट देणगी मिळाल्याचा पुरावा सापडला आहे. ट्रस्टच्या तीन शैक्षणिक संस्था वाढीव खर्चात सहभागी आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन अंशत: रोख स्वरूपात पुन्हा परत घेतले होते. असे अनेक पुरावे सापडले आहेत. ही रक्कम १२ कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय ट्रस्टने पावत्या दडपण्याव्यतिरिक्त प्रवेशाची व्यवस्था करण्यासाठी दलालांना मोठी रक्कम दिली आहे. ती८७ लाख रुपये असून पूर्णपणे बेहिशेबी असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हंटले आहे.
Anil deshmukh accused of hiding income of rs 17 crore
महत्त्वाच्या बातम्या
- Pornographic Case : पॉर्नोग्राफी केसमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन, 19 जुलैपासून होता
- मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- Corona Vaccine : गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर लसीचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर
- इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, सीरियल बॉम्बस्फोटांचा केला दावा
- रशियाच्या पर्म स्टेट युनिव्हर्सिटीत माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार, 8 विद्यार्थी ठार, अनेक जण जखमी