• Download App
    प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण । Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar murder case eye witness examination completed in court

    प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar murder case eye witness examination completed in court


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार असून, डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरची साक्ष आणि उलटतपासणी त्यावेळी नोंदविण्यात येणार आहे. Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar murder case eye witness examination completed in court

    विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत सहा साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले आहेत.



    या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्‍चिती करण्यात आली आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची मार्च महिन्यात साक्ष नोंदविण्यात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्यावर यांच्यावर अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरारी झाले, अशी साक्ष या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. त्यावर बचाव पक्षातर्फे ऍड. प्रकाश साळसिंगीकर, ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ऍड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी गेल्या तीन सुनावण्यांमध्ये या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली.

    Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar murder case eye witness examination completed in court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस