• Download App
    मानवतेला काळिमा फासणारी घटना , एक दिवसाच्या मुलीला कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला सोडले ; कुत्रीने रात्रभर स्वतःच मुल म्हणून सांभाळले। An incident that disgraced humanity, leaving a one-day-old girl by the side of puppies; The dog took care of himself as a child throughout the night

    मानवतेला काळिमा फासणारी घटना , एक दिवसाच्या मुलीला कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला सोडले ; कुत्रीने रात्रभर स्वतःच मुल म्हणून सांभाळले

    ही घटना लोरमी ठाण्याच्या क्षेत्रातील सारीसताल गावात घडला आहे.दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. An incident that disgraced humanity, leaving a one-day-old girl by the side of puppies; The dog took care of himself as a child throughout the night


    विशेष प्रतिनिधी

    छत्तीसगड : माणसांमधून माणुसकी संपत चालली असली तरी प्राणीमात्रांमध्ये मात्र मानवता दिसत आहे.छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.येथे एक दिवसाच्या नवजात अर्भकाला कोणीतरी गावातील आडोशाच्या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला फेकले.

    मात्र या कुत्र्यांच्या पिल्लांच्या आईने रात्रभर मुलीला काहीच इजा न करता रात्रभर सुरक्षित सांभाळले.ही घटना लोरमी ठाण्याच्या क्षेत्रातील सारीसताल गावात घडला आहे.दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

    ग्रामस्थांनी सकाळी या बालकाला कुत्र्याच्या पिल्लांदरम्यान पाहिले.याची माहिती लोरमी पोलिसांनी दिली.पोलिसांनी या नवजात अर्भकाला त्वरित मातृ शिशू रुग्णालयात पोहोचले. येथे नवजात मुलीवर प्राथमिक उपचार केले गेले.

    त्यानंतर चाइल्ड केअर मुंगेली येथे अधिक उपचारांसाठी पाठवले गेले.मात्र या प्रकरणात आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सध्या चौकशी सुरू आहे, त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल.

    An incident that disgraced humanity, leaving a one-day-old girl by the side of puppies; The dog took care of himself as a child throughout the night

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस