विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले होते. मात्र आता आठ दिवसानंतर या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली आहे. आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरु होण्यास प्रारंभ झाला आहे.
Amravati Market Opened eight days later
संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे, हिंसाचारामुळे आठशे ते हजार कोटीचे शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आता शहरातील परिस्थिती पूर्ववत येत आहे. सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी कायम राहणार आहे.
– अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली
– संचारबंदीमध्ये काही तासांची शिथिलता
– सायंकाळी ६ पर्यंत बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा
– शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली
Amravati Market Opened eight days later
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई