प्रतिनिधी
नारायणगाव : महाराष्ट्राची लोक परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी आग्रही राहिले शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण आजही कायम आहे.Amol Kolhe’s turn on the horse; Said, Kurghodi will not do in politics
गावागावातल्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या बैलगाडा शर्यतींसाठी या दोन्ही नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द अक्षरश: पणाला लावली. आता बैलगाड्या शर्यती गावागावांमध्ये जत्रेत सुरू झाल्या आहेत. याच मुद्द्यावरून मध्यंतरी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत लांडेवाडी होत आहे. घोडीवर बसून बारी करायला या, असे आव्हान डॉ. अमोल कोल्हे यांना दिले होते. प्रत्यक्षात अमोल कोल्हे लांडेवाडीला गेले नाहीत पण त्यांनी बैलगाडा शर्यत घोडीवरची बारी करूनच दाखवली…!! मात्र ती खेड राजगुरुनगर तालुक्यातील लिंबगावच्या मानाच्या खंडोबा घाटात. तेथील बैलगाडा शर्यत अमोल कोल्हे उत्साहाने सहभागी झाले आणि बैलगाड्या समोर घोडीवर बसून बारी केलीच…!!
मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपणही कोणावर कुरघोडी करण्यासाठी राजकारण केले नसून यापुढेही तसेच कुरघोडीचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.